Summary of the Book
बी.एस्. कुलकर्णी यांची पक्षिनिरीक्षणावर तीन पुस्तके यापूर्वी लोकप्रिय झाली आहेत. आता `रानबदके’ हे चौथे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. जाणकार पक्षितज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ख्याती पसरली आहे.
पक्षिनिरीक्षणातील सौंदर्याच्या जागा, सूक्ष्म हालचाली, पक्ष्यांचे वागणे, बोलणे, त्यांच्या लकबी, आकलनीय अथवा अनाकलनीय घटना-प्रसंगांतील त्यांच्या तर्र्हा. त्यांची भूमिका कधी गंभीर, कधी विनोदी, तसेच, खोलवर परिणाम करणारी, आस्वादात्मक साधी, सोपी, तरीही रसाळ, ओघवती भाषा पक्षिजीवनाचा वेध घेणारी आहे.
पक्ष्यांच्या परिचयाबरोबर त्यांनी दिलेली लोककथेची जोड अभिनव आहे. चित्रमय भाषेत लिखाण करून त्यांनी सर्वसामान्य वाचकांपर्यंत पक्षिनिरीक्षण पोहोचविलं आहे.