Summary of the Book
लोकसाहित्याच्या अभ्यासाला जागतिक पातळीवर प्रारंभ होऊन जवळ जवळ एक शतक पूर्ण होत आहे.
पाश्यात्य देशात ही अभ्यासशाखा अनेक अंगांनी शास्त्रशुद्धदृष्टया बहरली. अजूनही आपल्या देशात लोकसाहित्य म्हणजे आदिवासी, पददलितांचे साहित्य अशी जाण असणारा एक वर्ग आहे भारतात व पर्यायाने महाराष्ट्रात लोकसाहित्य, लोकपरंपरा विविधतेने नटलेल्या आहेत. त्याचा धांडोळा शास्त्रीयदृष्टीने घेणे महत्त्वपूर्ण आहे.