Home
>
Books
>
आत्मकथन, वैचारिक, धार्मिक, संत साहित्य, आध्यात्मिक
>
Sadguru Shreegondavalekarmaharaj Pravachananche Subodh Sar (January to December) January Te December Mahinyatil Pravachane - सद्गुरु श्रीगोंदवलेकरमहाराज प्रवचनांचे सुबोध सार जानेवारी ते डिसेंबर जानेवारी ते डिसेंबर महिन्यातील प्रवचने
सद्गुरु श्रीगोंदवलेकरमहाराज प्रवचनांचे सुबोध सार जानेवारी ते डिसेंबर
सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अनेक वर्षांच्या निरुपणांच्या टिपणांच्या आधारे ज्येष्ठ गुरुबंधू श्री.गोखले यांनी प्रवचनांचा एक पोथी-ग्रंथ प्रकाशित करुन बरीच वर्षे झाली. त्याच्या कितीतरी आवृत्या निघाल्या. महाराजांच्या अनुग्रहितांच्या नित्य वाचनामध्ये हा ग्रंथ असतोच. प्रापंचिकांना परमार्थ सोपा-सुलभ करण्याचे फार महान कार्य महाराजांनी सर्व जीवितभर अतिशय प्रेमाने व माऊलीच्या वात्सल्याने केले होते. ते मार्गदर्शन आजही तितकेच मोलाचे आहे. महाराजांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांनी अतिशय गहन व क्लिष्ट परमार्थ सोपा करुन सांगितला आहे. त्यांच्या अनुग्रहित डॉ. ऋजुता विनोद यांनी त्यांना समजायला-आचरायला सोपं जावं म्हणून टिपणे काढली होती. तीच येथे एकत्र देत आहोत.