Summary of the Book
वि. स. खांडेकर यांनी लघुनिबंध या फॉर्ममध्ये अनेक प्रयोग केले. त्यांच्या लघुनिबंध लेखनाची सुरुवात 1927 मध्ये झाली. त्यांचे लघुनिबंध वाचकांशी संवाद साधणारे, त्याला आपलेसे करणारे होते. विविध नियतकालिके, दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लघुनिबंधांना लोकप्रियाता मिळत होती. 1927 ते 1961 या कालावधीत खांडेकरांनी लिहिलेल्या परंतु अप्रकाशित राहिलेल्या लघुनिबंधांचा 'रानफुले’ हा संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केलेल्या या संग्रहात 16 लघुनिबंध असून ते खांडेकरांच्या लेखनवैशिष्ठ्यांची साक्ष देणारे आहेत.