Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
अमेरिकेत काळे विरुद्ध गोरे अशा वर्णभेदाच्या काळात मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) याने त्याविरुद्ध लढा पुकारला. यासाठी त्याच्याकडे शस्त्र होते ते महात्मा गांधी यांच्या अहिंसेचे. त्यामुळेच या वांशिक लढ्यात कोठेही रक्तपात झाला नाही. व्यवसायाने धर्मगुरू असला तरी मार्टिन पुरोगामी होता. नव्या कल्पना, विचार यांना तो जवळ करीत असे.
विचारवंत, उत्तम वक्ता, कणखरपणा, संवेदनशीलता, त्याग, समर्पण, वेदना असे गुण त्याच्याकडे होते. म्हणूनच तो एका ठराविक वंशाचा नेता न राहता मानवतावादी नेता ठरला. अहिंसेचे तत्त्वज्ञान त्याने स्वीकारले असले, तरी गांधी तत्त्वज्ञानाचे अन्य मुद्दे मात्र विचारात घेतले नाहीत. म्हणूनच तो गांधीजींपेक्षा वेगळा ठरतो. अशा या मानवतावादी नेत्याच्या गुणावगुणांचा लेखाजोखा डॉ. अश्विनी धोंगडे यांनी ‘स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.)’मधून मांडला आहे.