Summary of the Book
चिकाटी कशी असावी, असा प्रश्न विचारला तर मुंगीसारखी असं उत्तर येईल. या मुंगीची कार्यप्रणाली नेमकी असते कशी, मुंगीचं व्यवस्थापनशास्त्र कसं असतं, यांसारख्या प्रश्नांची शास्त्रशुद्ध आणि विस्तृत माहिती प्रदीपकुमार माने यांच्या या पुस्तकातून मिळते. मुंगी आणि मानव, तत्वविचारातील मुंगी, मुंगीशास्त्रज्ञ आदी विभागातून मुंग्यांच्या जगाविषयी अधिक माहिती मिळते. मुंगी समाजाचं यश स्पर्धा व सहकार्य आणि त्यांचे या दोन गोष्टींवर अवलंबून असतं, असं लेखक सांगतात. ते सांगतात त्यांनी त्याविषयी साद्यंत माहिती दिली आहे. कार्यक्षम मुंगीकडून संदेशवहन, वाहतूक व्यवस्थापनसह आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, असा धडा पुस्तकातून मिळतो.