Hard Copy Price:
25% OFF R 340R 255
/ $
3.27
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भय आणि अद्भुतता यांचे मिश्रण असणाऱ्या कथा हे हृषीकेश गुप्ते यांचे वैशिष्ट्य 'घनगर्द कथासंग्रहातील कथांमधून जाणवते. पहिल्या 'घनगर्द' या कथेतून पौंगाडावस्थेतील गार्गीला आपण खोल दरीत पडत आहोत, बचावासाठी धावलेल्या बाबाचाही तोल जातो, अशी जाणवणारी भीती व वास्तवात ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्यातून होणारी तिची घालमेल दिसते. लेखनासाठी बैठक मारलेली असताना बाहेर पावसात भिजून आलेली अनिलकही व्यक्ती व जाताना त्याने नायकाला दिलेली कथांची अनेक बीजे असलेली कुपी, लहानपणी केलेल्या आंब्यांची चोरीमुळे निर्माण झालेली अपराधाची भावना व देवधर काकूंचे पात्र यातून नायकाचे भयाने भारलेले आयुष्य 'पानगळ' मधून समोर येते. भूतकाळाच्या सावटात मनासारखे आयुष्य पेलताना घ्यावा लागणाऱ्या मोबदल्याचे रप 'मुआवजा' मधून जाणून घेताना दाहक भय समोर येते. 'रमलवाटा' तील वास्तव व कल्पनांच्या मिश्रणातून उमटलेले भय वाचकांना खिळवून ठेवते
अफलातून, आत्ता फक्त पहिलीच कथा ( घनगर्द) वाचून संपली, मनात भावनांचे इतके कल्लोळ उठलेयत की या कथेला भयंकर चांगली म्हणू, टेरिबल म्हणू, उत्तम म्हणू की अफलातून म्हणू काही ठरत नाहीय. कथा वाचतांना उत्कंठेमुळे छातीत धड धड वाढते, गार्गीच्या मनोव्यापाराच्या वर्णनामुळे मध्येच श्वास घ्यायचा विसर पडतो, इतकं सुंदर काहीतरी आपल्याला वाचायला मिळतंय या भावनेतून कंठ दाटून येतो अंगावर रोमांच येतात. ह्रिषीकेश गुप्ते व रोहन प्रकाशन यांचे एक अप्रतिम अनुभव दिल्याबद्दल लाख लाख आभार.
निरंजन गुप्ते