Summary of the Book
कुमारवयीन मुलांसाठी मराठीमधून लेखन करणार्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बहुतांश मुळे इंग्रजीतील साहित्याकडे वळत असल्याच्या पार्श्वभूमीवर विलास फडके यांनी लिहिलेले हे पुस्तक वेगळे ठरावे. नकाशाच्या सहायाने सुर्गम आयलँडवर स्वारी करायला निघालेला नायक जीम होकिंन्स, धाडसी कॅप्टन अन त्याच्या सहकार्यांची ही कथा आहे. या वेधक कथेचे रंजकता हे वैशिष्ट्य आहे.
हिस्पॉनिओ हे त्यांचे जहाज. समुद्राच्या लाटा पार करून आयलँडवर पोहोचण्याचा थरारक प्रसंग या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.कथेच्या ओघात समुद्रावरील जीवन, जहाज, समुद्र आणि माणसाचे नाते, साहस,धाडस अशा अनेक गोष्टींशी परिचय होतो. शत्रूच्या शिबिरात आलेला जखमी जिम, गंभीर जखमा झालेले कॅप्टन स्मॉलेट, कॅप्टन सिल्व्हर यांचे साहस स्तिमित करते.