Summary of the Book
प्रदीप ठाकूर आणि पूजा राणा या दिल्लीतील दोन पत्रकारांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक लिहिले आहे. अण्णा हजारे यांचे थोडक्यात चरित्र तसेच भ्रष्टाचारविरोधी लढ्याचा सारा वृत्तांत आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे हे सारे या पुस्तकात एकत्रितपणे दिले आहे. धनंजय बिजले यांनी या पुस्तकाचा चांगला अनुवाद केला आहे. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी केलेले उपोषण व त्यावेळच्या घडामोडींचे संकलन यात उत्तमपणे केले आहे.