Summary of the Book
दक्षिण अमेरिकेत अजूनपर्यंत निग्रोंची कशी छळवणूक चाललेली आहे याचे प्रत्यक्ष अनुभवलेले हे चित्र आहे.
गुलामगिरी नष्ट होण्याकरता यादवी युद्ध झाले. पण निग्रोंच्या नशिबी अजून जनावरांसारखेच जिणे आहे !
गौरवर्णीय लोक निग्रोंना मानवी हक्कांपासून मानवी जीवन जगण्यापर्यंत कसे वंचित करतात व कुत्र्यामांजरांपेक्षाही कसे कमी लेखतात या हकीकती कितीही कारणे दिली तरी समजण्यासारख्या नाहीत.
दक्षिण अमेरिकेतल्या निग्रोंचा शास्त्रीय पद्धतीने केलेला हा अभ्यास आहे. ज्या अवस्थेत अनुभवले आहेत ते शब्दश: खरे अनुभव आहेत आणि ते जसेच्या तसे त्याच स्थितीत येथे नमूद केले आहेत. विशेष म्हणजे, एका गोर्या माणसाने (कायापालट करून) निग्रो ‘बनल्या’नंतर घेतलेले हे स्वानुभव आहेत.