Summary of the Book
मी स्वतः `मनोरंजनातून संस्कार’ हे सूत्र मानणारा आहे. चेटकिणी, राजपुत्र, जादूगार इत्यादी `बिचार्याना’ मुलांच्या दुनियेतून `हद्दपार’ केले जाऊ नये असे मानणारा आहे.
भुते आणि राक्षस, राजपुत्र आणि चेटकिणी, जादूचे वाडे आणि बोलणारे प्राणी, अॅलिस आणि डॉ. डूलिट्ल, मिकी आणि माऊस या सार्याना कुणी अडगळीच्या खोलीत ढकलत असेल तर त्यांना कडी-कोयंडे तोडून मुक्त केले पाहिजे आणि मुलांच्या जगात मोकळे सोडले पाहिजे, असे मला वाटते.
चांगला संदेश, मनोरंजन आणि चांगले संस्कार यांचा उत्तम समन्वय साधला जावा अशी बालवाङ्मयाची गरज असते. हे जाणीवपूर्वक निर्माण केलेले साहित्य असू शकते. चिकाटी, एकाग्रता, एकजूट, धैर्य, साहस, देशप्रेम व त्याग या गुणांची महती सांगणारा `जंगलातील दूरचा प्रवास’ सर्वांना आवडेल असा मला विश्र्वास वाटतो.
-भारत सासणे