Summary of the Book
चंद्रकांत महामिने हे आजच्या काळातील मराठीतील आघाडीचे विनोदी लेखक आहेत. खाणावळीत-हॉटेलात काम करणारा, डोक्यावर भेळीची परात घेऊन गल्लोगल्लीत विक्री करणारा एक सामान्य मुलगा मराठीतील नामवंत लेखकांच्या मांदियाळीत कसा जाऊन बसतो याचा स्वतः लेखकानेच मांडलेला हा आपल्या जीवनाचा लेखाजोखा वाचकांचे कुतूहल जागवणारा आणि अंतर्मुख करणारा आहे. दु:खांचे, अडचणीचे प्रतिकूल क्षण टिपतानाही त्यांच्या लिखाणातील मिस्किलपणा त्यांच्या प्रसन्न, समाधानी आणि चैतन्यमयी स्वभावाचे दर्शन घडवितो. सहजता हा त्यांच्या लेखणीचा स्थायीभाव आहे.