Home
>
Books
>
माहितीपर, कायदेविषयक, मार्गदर्शनपर
>
Sahkari Sanstha V Bankanchya Sabhasadanche Varas V Nominichi Nondani - सहकारी संस्था व बँकांच्या सभासदांचे वारस व नॉमिनीची नोंदणी
सहकारी संस्था व बँकांच्या सभासदांचे वारस व नॉमिनीची नोंदणी
Hard Copy Price:
R 100
/ $
1.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
ही पुस्तिका विशेषतः सहकारी संस्थांच्या, पदाधिकारी, अधिकारी व सेवक यांचेसाठी तयार केली आहे. पदाधिकारी, अधिकारी व सेवकांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 30 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे कलम 25 प्रमाणे वारस ठरविण्याची कृती करताना ढोबळमानाने तरी माहिती असावी हा हेतू आहे.
मयत सभासद कर्जदार अथवा मयत सभासद वा जामीनदार यापैकी कोणच्याही मृत्यूमुळे त्यांनी सहकारी संस्थेशी केलेला कोणताही करारमदार समाप्त होतो. अशावेळी त्याचे वारसदाराविरुध्द कारवाई करावी लागते. अशी कृती करण्याऐवजी संस्था मौन धरतात. मयताचे वारस ठरविण्याचे अधिकार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समिती किंवा संचालक मंडळास आहेत. हे काम करण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्यासाठी काही आवश्यक माहिती पुरविण्याचे काम हे पुस्तक करते.
विशेष करून स्थावराचे संदर्भात सर्व अधिकार महसूल खात्याकडे आहेत. म्हणून जरी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीने वारस ठरविले तरी त्यांची नोंद महसूल अधिकायांच्या दप्तरांत होणे अगत्याचे. साहजिकच व्यवस्थापन समितीने महसूलखात्याचे सहकार्य जरूर घ्यावे अन्यथा हे काम पूर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या येणे थकबाकीची वसूली करणे हे जिकिरीचे काम आहे. मयताचे दोन-चार वारस असतील तर त्यापैकी कोणीही स्वत: पुढे येऊन सहकार्य करण्याची वृत्ती क्वचितच दिसते. त्यासाठी व्यवस्थापक समितीला पुढाकार घेऊन वारस ठरविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा काही प्रकरणात वसूली होण्यात विलंब होतो.