Summary of the Book
यशाची व्याख्या काय, यशस्वी व्यक्ती कोणाला म्हणायचे या मुलभूत प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत मनोज अंबिके यांच्या या पुस्तकाला प्रारंभ होतो. मात्र, याच प्रश्नांची उत्तरे यशाकडे घेऊन जाणारी आहेत. ध्येय कसे ठरवायचे, नियोजन कसे करायचे याची चर्चा करून ध्येय गाठण्यासाठी कोणते गुण आत्मसात केले पाहिजेत, याबद्दल ते सांगतात.
दूरदृष्टी, कामात झोकून देणे, आजचे काम आजच करणे, मल्टिटास्किंग, ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य पद्धत अवलंबणे आदी गोष्टींवर ते भर देतात. ध्येय गाठण्यासाठी कोणाचे ऐकावे किंवा मैत्री कोणाशी करावी, तर जो तुम्हाला सकारात्मक दृष्टी देईल, प्रोत्साहन देईल. हे सांगताना त्यांनी उदाहरण दिले आहे.एकूणच चपखल उदाहरणे हे पुस्तकाचे वैशिष्ट्य.