Summary of the Book
कोकणात जन्म घेतलेल्या एका मनस्वी स्वभावाच्या सुंदर मुलीची ही हृदयाला भिडणारी कहाणी. बालपणी ‘फुलराणी’ कवितेत रमणारी, मोठेपणी नाटकातील रंगीबेरंगी जगावर भाळणारी, एका विलक्षण आवेगाने दशावतारी नाटकातील नायकाच्या प्रेमात गुरफटणारी आणि स्वत:च्या ‘पॅशनेट’ स्वभावाचा बळी ठरणारी जुईली...
फार वर्षांपूर्वी मधु मंगेश कर्णिक यांनी रेखाटलेल्या ‘देवकी’ या मुग्ध नायिकेनंतर पुन्हा एकवार त्यांच्या लेखणीतून साकार झालेली आणखी एक अविस्मरणीय नायिका जुईली...