Summary of the Book
'बाळ... ही पंगत बड्या लोकांसाठी आहे .' असं सुनावून एका गरीब मुलाला जेवणाच्या ताटावरून उठवलं गेलं होतं.
'व्यवसाय करणं तुम्हा मराठी लोकांचं काम नाही...' या अपमानास्पद शब्दांत त्याच मुलाला पुढल्या आयुष्यात वारंवार हिणवलं गेलं.मात्र निराश न होता तो मुलगा एकलव्याच्या जिद्दीनं अनुभवांना गुरु मानून शिकत राहिला .प्रदेशात जाऊन त्यानं किराणा दुकानात झाडूपोछा,लादीसफाई आणि पन्नास किलोंची पोती उचलणं अशा कामांपासून कारकिर्दीची सुरुवात केली.कष्टांच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर एका बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचा शिल्पकार बनला .हा मुलगा म्हणजे सुप्रसिद्ध 'अल आदिल 'समूहाचे अध्यक्ष 'मसालाकिंग ' धनंजय दातार!
धनंजय यांचं आजोळ म्हणजे अमरावती जिल्ह्यातलं चिमुकलं शिरखेड... जिथे त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला आणि दुबई म्हणजे त्यांची कर्मभूमी ...त्यांच्या कारकिर्दीच्या या दोन टोकांमधल्या संघर्षमय, तरीही रोमांचक वाटचालीचा हा वृत्तान्त...