Summary of the Book
तंत्रज्ञानाची मुळाक्षरे' हे पुस्तक म्हणजे माणसाने आपले जीवन सुखकारक व आनंददायी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा इतिहास आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला कितीतरी गोष्टी लागतात. घड्याळ, प्रेशरकुकर, कागद, कुलुप, चष्मा, शिलाईमशीन,औषध, विजेचा दिवा, तराजू, चलनी नोटा-नाणी कॅमेरा, सायकल,बस,धागे------- ही यादी न संपणारी आहे. अशा 90 शोधांची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. धरणं कशी बांधली गेली? नकाशे कुणी काढले? खनिज तेल पृथ्वीच्या पोटातून कसं बाहेर काढतात? व्हॅक्युम क्लिनर कुणी तयार केला. "क्ष' किरणांचा शोध कसा लागला? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तर आपणं या पुस्तकात शोधू शकतो. या पुस्तकात सोप्या सरळ भाषेत वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. पुस्तकाची रचना वौशिष्टपूर्ण आहे. प्रत्येक लेख हा वेगवेगळ्या शोधांचा प्रवास आहे. त्यामुळे पुस्तकातील कोणताही लेख उघडून वाचता येईल. शालेय विद्याथ्र्याना, जिज्ञासू वाचकांना हे पुस्तक वाचताना माहिती मिळविल्याचा, कुतूहल शमविण्याचा आनंद नक्की मिळेल.