Summary of the Book
रामायणात रावणाची बहिण शूर्पणखा हिला फारसे स्थान मिळालेले नाही. तिच्याबाबतीतील संदर्भही मोजके आहे. पण मुळात रामायण घडायला शूर्पणखा कारणीभूत ठरलेली दिसते. राम-लक्ष्मणाकडून झालेल्या तिच्या अपमानाचा सूड घेण्याचे वाचन रावण तिला देतो. त्या वेळी त्या दोघांचा वाढ रावणाकडून होणार नाही, असे वचन ती मागते. याचे कारण आपल्याला भरत बोयणे यांच्या 'शूर्पणखा'मधून मिळते. शूर्पणखा सुंदर, हुशार असते. तिची प्रीत खरी असते. एकतर्फी प्रेम करताना ती कोणतीही अपेक्षा करीत नाही. तिचे व्यक्तीमत्व, चरित्र या पुस्तकातून आपल्यासमोर येते.