Summary of the Book
सांप्रदायिकताविरोधी विधेयक समाजातील दरी वाढविणारे, या शीर्षकाखालील भय्याजी जोशी यांची मुलाखत, इस्लामपूर्व आणि प्रारंभिक काळातील सौदी अरेबियातील महिलांची सामाजिक स्थिती हा डॉ. प्रमोद पाठक यांचा लेख, अण्णा हजारेंवरील रमेश पतंगे, स्टीव्ह जॉब्जवरील अच्युत गोडबोल व अतुल कहाते यांनी तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हास्यचित्रकार विवेक मेहेत्रे यांनी लिहिलेली व्यक्तीदर्शने यात आहेत. रेखा बैजल, डॉ. बाळ फोंडके यांच्या कथा, प्रा. सुहास बारटक्के यांचे फुलांचा सडा... सडा वाघापूरचा हा निसर्गदर्शन घडवणारा लेख याशिवाय कविता, ललित यांच्या समावेशाने हा अंक सजला आहे.