Summary of the Book
एखाद्या बिल्डरकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कसा असतो? बिल्डर म्हणजे जमीन आणि पैशाच्या राशी असे आपले समीकरण असते. मात्र, या व्यवसायामागे किती मेहनत असते, किती परिश्रम आणि चिकाटी असते याची प्रचिती या पुस्तकातून येते.
प्रसिद्ध बिल्डर डॉ. सुधीर ग. निरगुडकर याची आत्मकथा या पुस्तकात वाचायला मिळते. शोभा बोंद्रे यांनी त्यांचे शब्दांकन केले आहे. निरगुडकर यांचे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे. ते एक बिल्डर आहेत, त्याचप्रमाणे एक शेतकरी, व्यापारीही आहेत. कलांचेही चाहते आहेत.
बांधकाम व्यवसायाकडे ते कसे वळले, या व्यवसायातील चढउतार, अडचणी आणि उत्तुंग यश ते सांगतातच, शिवाय अपरिहार्यपणे असणारी गुन्हेगारी- खंडणी, धमक्या आणि फसवणुकीचे प्रकारही त्यांच्या शब्दांत अनुभवायला मिळतात.