Summary of the Book
भ्रष्टाचार.... भ्रष्टाचार...! इकडे भ्रष्टाचार... तिकडे भ्रष्टाचार ! घरात भ्रष्टाचार... दारात भ्रष्टाचार ! सर्वत्र भ्रष्टाचार ! या भ्रष्टाचाराला आवर घालणार कोण ? भ्रष्टाचाराला आवर घाला म्हणणारे भ्रष्टाचारी ! भ्रष्टाचारावर टीका करणारे भ्रष्टाचारी ! भ्रष्टाचाराला निपटून काढू म्हणणारे भ्रष्टाचारी ! होणार काय ?
श्रीकृष्ण वासुदेव देव ! एक म्युनिसिपल कारकून. एके दिवशी सकाळीच जागा होतो, तो दैवी शक्ती घेऊन ! त्या शक्तीच्या जोरावर भ्रष्टाचाऱ्यांना सळो की पळो करतो. पण भ्रष्टाचाऱ्यांचीही शक्ती कमी नाही. तेही श्रीकृष्णाला घेरतात. हा श्रीकृष्ण ‘त्या’ श्रीकृष्णाचा धावा करतो. म्हणतो, श्रीहरी, आता विलंब नको ! हरी-अप, हरी!