Summary of the Book
मीडियातनंच स्वतःला न्याहाळणार्या या जगासमोर श्रीधर तिळवेंनी कवितेचं माध्यम ‘इडियट बॉक्स’सारखं उभं केलं आणि एकेका विषयाला बहाल केली एकेका चॅनेलची सत्ता. जागतिकीकरणाच्या या दुष्टचक्रात स्वतःसकट गवसलं जगाच्या मूळव्याधीचं मूळ या कवितेला. जगाचं ‘सफरिंग’ हेच ‘हॅपनिंग’च्या थाटात दाखवणार्या या चॅनेलगर्दीत ‘डी-स्ट्रॉयरी’नं चालवलेली ही ‘डिस्कव्हरी’ म्हणूनच मोलाची ठरते.