Summary of the Book
देशातील नावाजलेल्या वर्तमानपत्रातील एका शांत , संवत व्यंगचित्रकाराचे एका लढाऊ राजकीय संघटनेच्या जहाल नेत्यात रुपांतर कसे झाले ? साठच्या दशकात त्याने भूमिपुत्रांसाठी उभारलेल्या संघटनेने मराठी माणसाच्या रोजगाराच्या हक्क्साठी केलेल्या मागण्या आणि दक्षिण भारतीय व कम्युनिस्टांवर चढवलेल्या हल्ल्यांमुळे मुंबई कशी हादरली ? आक्रमक महाराष्ट्रधर्माची भलामण करतानाच त्याने कडव्या हिंदुत्तावाचा झेंड आपल्या खांद्यावर घेतला आणि भारताच्या राजकीय अजेंड्यावर हिंदुत्व कसे आणले ? देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्याने आपल्या मुठीत कशी ठेवली ? त्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर कसे घडवले ? लाखो मनांवर अधिराज्य गाजवताना अनेकांच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड दहशत कशी निर्माण झाली ? कोट्यावधींची उलाढाल असलेल्या मुंबईतील चित्रपट उद्योगावर त्याने आणि शिवसेनेने आपला धाक कसा निर्माण केला ? भारतीय जनता पक्षाशी त्यांची युती दीर्घ काळ कशी टिकली ? केवळ भारतभरातच नव्हे, तर पाकिस्तानही हे व्यक्तिमत्व कुतूहलाचा विषय कसे बनले ?
हे पुस्तक म्हणजे बाल ठाकरे या वादळी व्यक्तिमत्त्वाची कहाणी आहे . शिवसेनेचा उदय्ब, यशापयश आणि त्यातील बंडखोरीचीही ही कथा आहे . ठाकरे यांच्या व्यक्तित्वाचा घेतलेला वेध , त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व , शिवसेनेसारख्या लढाऊ राजकीय संघटनेची त्यांनी केलेली उभारणी , त्यांच्याभोवती उभे राहिलेले वाद आणि वादळे , राज आणि उद्धव या चुलतभावांमध्ये रंगलेला संघर्ष , बाळासाहेबांच्या मृत्यूने महाराष्ट्राच्या राजकारणामधील झालेला युगान्त आणि शिवसेनेच्या भावितव्यापुढे उभे राहिलेले प्रश्नचिन्ह यावरही हे पुस्तक साक्षेपाने प्रकाश टाकले .
वैभव पुरंदरे हे मुंबईतच लहानाचे मोठे झाले .ऐंशी व नव्वदच्या दशकात बाळासाहेबांचे नेतृत्व मराठीच्या मुद्याकडून शिवसेना व प्रादेशिक पक्षाची जहाल हिंदुत्वाकडे झालेली वाटचाल , त्याचे देशावर झालेले परिणाम हे त्यांनी जवळून पाहिले आणि अभ्यासले . पुरंदरे यांच्या पत्रकारितेची सुरुवात १९९३ मध्ये 'ब्लिट्झ' या राजकीय विषयाला वाहिलेल्या नियातकालीकापासून झाली . इंडियन एक्स्प्रेस , द एशियन एज , डेली न्यूज अँड अँनालिसिस ( डीएनए ) , मिड डे , मुंबई मिरर , हिंदुस्थान टाइम्स अशा नावाजलेल्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केले . वयाच्या तेविसाव्या वर्षी ' द सेना स्टोरी ' हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले . ' सचिन तेंडुलकर : अ डेफिनिटिव्ह बायोग्राफी ' या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे .