Hard Copy Price:
R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
स्टार व्यवसाय शोधून रिचर्ड कोचने 100 मिलियन पौंडांपेक्षा जास्त पैसे कमविले. या त्यांच्या नव्या पुस्तकात ते त्यांच्या यशाचं गमक सांगताहेत. तुम्हीही स्टार शोधून कसे श्रीमंत होऊ शकता हे दाखवून देत आहेत. वेगाने वाढणा-या व्यवसायाच्या क्षेत्रात स्टार व्यवसाय कार्यरत असतात. ते त्यांच्या क्षेत्रात बाजारात सर्वात पुढे असतात. स्टार दुर्मिळ असतात. परंतु धीर धरा, सावकाश, शांतपणे या पुस्तकाचे वाचन करा. तुम्ही स्टार शोधू शकाल किंवा तुमचा नवा स्टार निर्माण करूशकाल. उद्योजक होऊ इच्छिणा-याकरिता किंवा गुंतवणूकदारांकरिता (मोठे किंवा मध्यम) हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. स्टार व्यवसायात काम करण्याचे लाभ कळणा-या महत्त्वाकांक्षी कर्मचा-यासाठी हे पुस्तक मौल्यवान आहे. जबाबदारीचा अनुभव, वेगाने होत जाणारी वौयक्तिक प्रगती, चांगला पगार, भरपूर बोनस, शेअर प्राप्त होण्याची शक्यता असे अनेक लाभ स्टार व्यवसाय तुम्हाला प्राप्त करून देतो. तुम्ही कोणीही असा. स्टार शोधा, त्यात गुंतवणूक करा. तुमचं जीवन सर्वागानी मधुर व वौभवशाली होईल. रिचर्ड कोचने फिलोफॅक्स, बेल्गो रेस्टॉरंट, प्लायमाऊथ जीन आणि युरोपमधील सवांत मोठा व नफेशीर इंटरनेट गँबलिंग व्यवसाय, बेटफेअर हे स्टार व्यवसाय केले. त्याचं नशीब उजळलं. मूळ गुंतवणुकीच्या कितीतरी पटीने पौसे मिळाले. रिचर्ड कोच हे अनेक व्यावसायिक पुस्तकांचे लेखक आहेत. 80/20 प्रिन्सिपल या त्यांच्या पुस्तकाचा जगातील 24 भाषांत अनुवाद झाला. त्याच्या 7लाख प्रती खपल्या.