Summary of the Book
श्री . मधुसूदन देसाई यांनी लिहिलेल्या मुद्रा विज्ञान चिकित्सा या पुस्तिकेचे वाचन केल्यानंतर ' आपले आरोग्य - जीवन आपल्या हातात ' याचा प्रत्यक्ष परिचय होतो .
साध्या साध्या उपायाने आणि घरच्या घरी साधे उपचार , प्रयोग करून आरोग्य सदृढ राखता येते कोणत्याही विकाराशी सहजपणे मुकाबला करता येतो हे ' औषधाविना आरोग्य ' या पुस्तकात सांगितले आहे .
आरोग्य , दीर्घायुष्य , तारुण्य टिकवण्याचा , आजार टाळण्याचा व झालेले आजार सुसह्य कसा होईल यासाठी सोपे , बिनधोक व खात्रीचे उपाय ' औषधाविना आरोग्य ' या पुस्तकात श्री . मधुसूदन देसाई यांनी दिले आहेत.
सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |
सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दु:खामाप्नुयात् ||
हेच मधुसूदन देसाई यांचे मागणे औषधाविना आरोग्य या पुस्तकात आहे.