Summary of the Book
मराठी रंगभूमीच्या एवढ्या अफाट नाट्यपसाऱ्यात नेमक कोणत नाटक निवडाव,त्यातला कोणता प्रवेश वा भाग निवडावा? अशावेळी आपल्या समोर जर कोणी निवडक नाट्यप्रवेशांची पुस्तक ठेवली तर?........ सभा, संमेलन, विविध स्पर्धा अशा महत्वाच्या प्रसंगी करता येतील असे पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतून प्रवेश निवडले आहेत.अनेक वयोगटाच्या लोकांना हे प्रवेश उपयोगी पडतील असा विश्वास आहे.
काहींना हे रंगमंचावर करून पहाता येतील.काहींना स्पर्धेत वाचनासाठी उपयोगी पडू शकतील, तर काहींना स्वान्तसुखाय आपल्यापुरत घरीही हि वाचता येईल. अस भाषा वैभव, नाट्यवैभव आपल्या संग्रही हवच. या प्रवेशांच्या जोडीला अनेक नाटकांतील स्वगतांचही स्वतंत्र पुस्तक आहे .