Summary of the Book
घराघरांत स्थान मिळवलेला कम्प्युटर आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग होऊन बसला आहे. तरीही कम्प्युटरची संपूर्ण माहिती आपल्याला नसते. त्यामुळे अनेक अडचणी उद्भवतात. त्यावर मात करण्यासाठी नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांचे हे पुस्तक मदत करते.
पुस्तकात प्रारंभी कम्प्युटरची प्राथमिक माहिती आपल्याला समजते. त्यानंतर 'स्लो चालणाऱ्या कम्प्युटरचा स्पीड कसा वाढवावा ' या विभागात मेमरी, ओव्हरलोडिंग आदींची माहिती मिळते. तिसऱ्या विभागात इन्स्टॉलेशनच्या समस्यांवर उत्तरे शोधली आहेत.
चौथा विभाग फाइल्स आणि फोल्डर्समध्ये येणाऱ्या समस्यांचा वेध घेतो. प्रिंटर आणि स्कॅनरमध्ये येणाऱ्या सर्वसाधारण समस्यांचा विचार केला आहे. पाचवा विभाग इंटरनेटचा आहे.