Summary of the Book
`मध्यम वय सावध आहार’ हे आपले पुस्तक मला फार आवडले. आपली लिहिण्याची शैली, शब्दप्रयोग वगैरे आकर्षक वाटले. आपल्या पुस्तकातली वैशिष्ट्ये म्हणजे पुस्तकाची सुरुवात प्रश्र्न-उत्तर या पद्धतीने केलेली आहे. विषयाची मांडणी, सोपी-सुलभ, सुटसुटीत, सर्वांना समजेल पण अत्यंत परिणामकारक व मनावर बिंबेल अशी आहे. आपल्या पुस्तकात दिलेली माहिती संपूर्णतः शास्त्रीय संशोधन करून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित आहे व त्यामुळे ती विश्र्वासार्ह ठरते.
- डॉ. कमला सोहोनी (पहिल्या आवृत्तीच्या वेळी लिहिलेल्या पत्रातून)
सौ. धुरू यांचा आहारशास्त्राचा अभ्यास आहे, तसेच त्यांना पाकशास्त्राची आवडही आहे. त्यामुळे आहारशास्त्र व पाकशास्त्र यांचा सुंदर मेळ घालणे त्यांना छान जमले आहे. सावध आहाराचे हे पुस्तक मध्यमवयीनांसाठी लिहिलेले असले तरी आहाराविषयी सावधानता बाळगणार्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीने वाचावे – नव्हे अभ्यासावे असे पुस्तक आहे.
- डॉ. विठ्ठल प्रभू (पहिल्या आवृत्तीच्या वेळी लिहिलेल्या पत्रातून)