A. A. Shaikh
20 Jul 2018 04 09 PM
डॉ. किशोर कुलकर्णी लिखित "पासवर्ड सुंदर हस्ताक्षराचा" पुस्तक अतिशय उपयोगी आहे. यामुळे निश्चितच आपल्या अक्षरात सुधार होऊन व्यक्तिमत्वात भर पडते. टिंब ते उभी-आडवी-तिरकस-गोलाकार रेषा कशा पद्धतीने रेखाटाव्या जेणेकरून अक्षर सुंदर होईल याबाबत तंतोतंत मार्गदर्शन केले आहे. "अक्षर कळते संकट टळते" या उक्तीनुसार अक्षर वाचण्याजोगे असले पाहिजे.
डॉ. कुलकर्णी यांचे हे पुस्तक मराठीच नव्हे तर इंग्रजी, हिंदी इतकच काय ऊर्दू लिपीतील अक्षर सुधारण्याकरिता देखिल उपयोगी आहे. मराठी तसेच ऊर्दू शाळेतदेखील त्यांनी कार्यशाळा घेतली आहे. वर्ष 1996 पासून त्यांनी सुंदर हस्ताक्षराबाबत 350 हून अधिक कार्यशाळा घेतलेल्या आहेत ज्यामुळे सुमारे 2000 विद्यार्थ्यांचे अक्षर दुरुस्त झाले आहे. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशातही कार्य़शाळा संपन्न झाल्या आहेत . अक्षर सुधारण्यकरिता त्यांचा हा अक्षरयज्ञ अखंडित राहो, हीच सदिच्छा..शुभेच्छा...धन्यवाद!
- ए. ए. शेख, जळगाव
Devendra Patil
20 Jul 2018 03 48 PM
किशोर कुळकर्णी यांनी 'पासवर्ड सुंदर अक्षराचा' हे पुस्तक लिहून गचाळ अक्षर असलेल्या बालकांना नवा आशेचा किरण दिला आहे. पुस्तक छोटेखानी असले तरी ते विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त असेच आहे. लिपी ज्या मूळ चिन्हांनी बनलेली असते त्या चिंन्हांचा सराव करावा तरी कसा याबद्दल सोदाहरण मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. वर्तुळ, अर्धवर्तुळ आणि रेषा यामुळे मुळाक्षरे लिहितांना अक्षर कसे सुंदर होते याचेही विवेचन केले आहे या पुस्तकात. हे पुस्तक म्हणजे खरे तर संगणक युगात देखील हस्ताक्षर टिकविण्याची धडपड म्हटली पाहिजे. सुघड अक्षर घटवून विद्यार्थ्यांनी ही अक्षर संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करावे हे महत्त्वाचे ठरते. खूप छान पुस्तक आहे हे... लेखक किशोर कुळकर्णी यांच्या उपक्रमास शुभेच्छा...