Summary of the Book
युद्धाच्या कथा रम्य असतात. कारण त्या चित्रथरारक असतात. साहजिकच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच त्या आवडतात.
पण या संग्रहातील कथा केवळ चित्तथरारक आहेत असे नव्हे, तर रणनीती, हेरगिरी, चातुर्य, साहस, धाडस अवलंबून शत्रुपक्षावर कशी मात करावयाची आणि स्वदेशप्रेम कसं कणखर असावं याचे आदर्श वस्तुपाठ देणार्या अशा कथा आहेत.
तशात ह्या कथा काल्पनिक किंवा रचलेल्या नाहीत; तर त्या प्रत्यक्षात युद्धभूमीवर घडलेल्या आहेत आणि ह्या कथा सांगितल्या आहेत निवृत्त कॅ. राजा लिमये ह्यांनी, साध्या नि सोप्या भाषेत, पण मनोरंजक नि चित्ताकर्षक शैलीत.