Summary of the Book
मुलासाठी सर्वस्व पणाला लावणारी एक आई! न्याय मिळविण्यासाठी तिने दिलेला जीवघेणा संघर्ष. तोही थोडाथोडका नाही, पंधरा वर्षं! आयुष्यातही ही उमेदीची वर्षं झगडण्यात जातात. अखेर विजय मिळतो! या लढाईत लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते तिची आई.
या संघर्षाला त्यावेळी आलेले माणसांचे, न्यायालयांचे, समाजाचे, चांगले-वाईट अनुभव कधीही विसरता येणार नाहीत. निर्भयपणे लढणार्या स्त्रीला आत्मबळ देणारं पुस्तक!