Summary of the Book
शशिकांत श्रीखंडे यांनी लिहिलेल्या राज कपूरवरील या चरित्रात त्याच्या अष्टपैलू कारकिर्दीचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राजकपूरला मिळालेली ऍवॉर्ड तसेच त्याच्या चित्रपटांची यादी ही अभ्यासकांना उपयोगाची ठरेल. राज कपूरच्या व्यक्तिगत आठवणींपेक्षा त्याने आपल्या चित्रपटात कोणती कामगिरी केली यावर लेखकाने अधिक भर दिला आहे. प्रत्येक चित्रपटासंदर्भांतील समर्पक छायाचित्रे आणि त्याचे विश्लेषण यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.
व्ही .शांताराम आणि लता मंगेशकर, नर्गिस, मुकेश, आणि हसरत जयपुरी, शंकर -जयकिसन आदी नामवंत मंडळीबरोबर त्याचे संबंध कसे होते याचा आढावा लेखकाने वेगवेगळ्या लेखात घेतला आहे.