Summary of the Book
समकालीन हिंदी प्रस्थापित लेखकांमध्ये "कमल चोपडा' हे एक महत्त्वाचं नाव. आपल्या सभोवतालचं जीवन, त्यातली सहजता, गंभीरता आणि कधी कधी भयावहताही ते सहजतेने पाहतात, अनुभवतात. आपल्या भोवताली घडणार्या घटना-प्रसंग, ते घडवणार्या विविध व्यक्ती, त्यांच्या विचार-विकार-वर्तनात जाणवणारी सुसंगती-विसंगती, स्वार्थ-त्याग, सामंजस्य-ताठरता याचं सूक्ष्म निरीक्षण ते करतात आणि आपल्या साध्या-सुध्या वाटणार्या कथांतून, मोजक्या शब्दांत त्याचं मार्मिक दर्शन ते घडवतात. शोषणमुक्त समाजाची निर्मिती, सामाजिक न्यायावर आधारित समाजातील व्यवहार, परस्परांतील प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता यांसारख्या ढासळत चाललेल्या मानवी मूल्यांची पुर्नप्रतिष्ठा यांची त्यांना आस आहे. त्यांचे कथाविश्व याच मूल्यांची उद्घोषणा, जपणूक करत असते. कधी सरळ सरळकधी उपहास उपरोधाच्या अंगाने. हिंदीमध्ये लोकप्रिय ठरलेल्या कमल चोपडांच्या "लघुतम' कथा मराठी वाचकांनाही आवडतील, विचार करायला लावतील, असा विश्वास वाटतो.