Summary of the Book
प्रो. तेन यांनी आपला 'वाड्मयसिद्धान्त' फ्रेंचमध्ये १८६४ मध्ये मांडला. त्याचे १८६१ मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले. गेली एकशेपन्नासाधिक वर्षे जगभरचे अभ्यासक या सिद्धान्ताची सातत्याने चर्चाचिकित्सा करीत आलेले आढळतात. विशेषतः 'वंश' (Race), 'वातावरण' (Milieu) व 'वेला' (Moment) ही तेनची तत्त्वत्रयी अभ्यासकांना निरनिराळ्या प्रकारांनी विचार करायला लावणारी आहे. या त्रयीखेरीज तेन यांनी इतरही महत्वपूर्ण विचार मांडलेले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांनी 'राष्ट्र व राष्ट्रीयते'चाही सुदीर्घ विचार केलेला आहे. आज भारतात आणि विशेषतः महारष्ट्रात वाड्मयाच्या सामाजिक अभ्यासाने जोर धरलेला आहे. दलित, ग्रामीण, भटके, आदिवासी, गिरीजन साहित्यकृतींनी वाड्मयाच्या सामाजिक समीक्षेची गरज अधोरेखित केलेली आहे. याशिवाय सध्या आपण 'भारतीय वाड्मया'च्या संकल्पनेचाही गंभीरपणाने विचार करीत आहोत. त्यामुळे तेनच्या सिद्धान्ताचे नव्याने अवलोकन होणे गरजेचे झालेले आहे.