Summary of the Book
सत्य रामोशी, बन्सीधर, पुरंदरचा नामा, एका अस्पृश्याच्या डायरीतील पाने, हास्याचा शोध अशा कथांमध्ये विविध जाती-जमातींची पात्रे असल्याने लेखकाने नागर आणि ग्रामीण भाषांचा संकर केला आहे. त्यामुळे वास्तवाचे सौंदर्य आणि ग्रामीण भाषेचे राकट माधुर्य कायम राहिले आहे. या कथांना वास्तवाची, सत्याची पार्श्वभूमी असल्याचे प्रतिपादन लेखकाने केले आहे. माणुसकीचा गहिवर हा श्री.म. माटे यांचा आणखी एक कथासंग्रहही कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केला आहे.