Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जागतिकीकरणाच्या ओघात विवाहसंस्थेला अनेक नवे पर्याय उभे राहत आहेत. अशा वेळी लग्नाविना राहता येईल का? राहिल्यास त्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक परिणाम काय होतील, अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह मंगला सामंत यांनी या कादंबरीत केला आहे. तरुणाईच्या भाषेत पण शास्त्रीय अंगानं तरीही रंजक शैलीत सामंत ही चर्चा करतात. विविध शक्याशक्यतांचा विचार करतानाचा सम्यक दृष्टिकोन, संवादात्मक लेखन यामुळं हा काहीसा चौकटीबाहेरचा विषय वाचनीय झाला आहे.
'Live-In Relationship'… काहीशी उच्चभ्रू आणि उच्च - मध्यम वर्गीयान्मध्येच "प्रसिद्ध" असलेली कल्पना. तीच कल्पना उचलून तयार झालेलं हे पुस्तक.
सध्या स्त्रिया-मुलींवरील हल्ले, बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार, भृणहत्या अशा अस्वस्थ करणाऱ्या घटना आपल्या भोवताली घडतायेत. एवढी पुरुषी मानसिकता विकृत का होत जात आहे? कदाचित याला आपणच जबाबदार आहोत, आपली पितृसत्ताक परंपरा, वंशाच्या दिव्यासाठी चाललेली धडपड, स्त्रियांविषयी अनादर, पुरुषी मत्सर हे जबाबदार आहे.
अतिप्राचीन भारतीय संस्कृती चा जर आढावा घेतला तर तेव्हा अशा घटना का होत नव्हत्या? कारण तेव्हा मातृप्रधान संस्कृती होती, मुक्त संबंधाना मान्यता होती, स्त्री-पुरुष दोघांना समान न्याय देणारी नैतिक व्यवस्था होती.
त्यानंतर हळु - हळु पुरुष प्रधान संस्कुती उदयास येऊ लागली, तिने विवाह बंधानास जन्म दिला आणि नैतिक-अनैतिकते च्या चष्म्यातून आपण समाजाकडे, in fact स्त्रियांकडे पाहायला सुरुवात केली.
आपल्याला आवडलेली स्त्री फक्त माझीच असायला हवी, दुसऱ्या कोणाचा हक्कच असू शकत नाही या भावनेतून स्त्रियांच्या चेहऱ्याची विटंबना होऊ लागली. यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेच आहे.
Jayesh Rathi
11 May 2013 05 30 AM
Excellet book...
Finished reading in just two sittings.
A great guide for the young generation.
Well done Mangala Samant !!!