Summary of the Book
खगोलशास्त्रासारख्या चित्तवेधक आणि मनोरंजक विषयाची मुलांना ओळख व्हावी तसेच याविषयात त्यांना आवड उत्पन्न व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. कुठलेही शास्त्र कथारूपात सांगितले तर ते समजायला अधिक सोपे जाते. नकळत त्यातून त्या विषयात रुची निर्माण होते.
प्रस्तुत पुस्तकात आकाशातील नक्षत्रे, राशी व इतर तारकासमूहांची त्यांच्याबद्दलच्या हिंदू, ग्रीक, रोमन, इजिप्शियन इ. पौराणिक गोष्टींसह सचित्र माहिती दिलेली आहे. माहिती संवादस्वरूपात व कथांच्याद्वारे प्रस्तुत केल्यामुळे मुलांना ती वाचायला नक्कीच आवडेल.