Summary of the Book
प्रियाल मोटे हे व्यावसायिक चित्रकार
असून मुलांसाठी काम करणे त्यांना
आवडते. ते मुलांसाठी लेखनही करतात.
'युवर्स नॅचरली' या पुस्तकमालिकेत
त्यांनी प्राणी, पक्षी, कीटक यांच्या गोष्टी
आकर्षक पद्धतीने मांडल्या आहेत.
निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे
एखाद्या बालकाच्या कुतूहलाने आणि
संवेदनशीलतेने पहिले तर
त्या अधिक सुंदर दिसतात.
पहिला पाऊस, मित्रांमधील गप्पा,
आजीच्या गोष्टी, ओढ्याच्या काठाने
केलेली छोटी सैर, सूर्योदय आणि
सूर्यास्त अशा छोट्या छोट्या गोष्टीतले
त्यांनी मांडलेले चित्रमय अनुभव
केवळ मुलांनाच नाही
तर मोठ्यानाही आवडतील !