Summary of the Book
10 जानेवारी 1984 हा तो दिवस होता. मंगलमूर्तीच्या श्रीसिद्धिविनायकाच्या रूपात त्या अदृश्य, निर्गुणी, निराकार विधात्याचा मी स्वीकार केला होता. कुणाला हा देवभोळेपणा वाटेल, पण माझ्यासाठी तो एक जीवंत अनुभव होता.
श्रद्धा, अंधश्रद्धा, जन्म, पुनर्जन्म, भोग, प्रारब्ध, पाप, पुण्य, कर्मकांड या जंजाळात मला इथे खोलात जायचं नाही. परंतु गेल्या आठ-दहा वर्षांत मी जे जगलो त्यात माझ्या आंतरिक भावविश्र्वाशी अतिजवळचं नातं जुळलेलं असं `देव` हे नाव आहे. माझ्या काव्यनिर्मितीच्या पातळीवर `देव` या नावाची निर्मिती निगडित आहे.
-नितीन तेंडुलकर