Summary of the Book
कवी बा. भ. बोरकर यांच्या कवितांनी रसिक तृप्त होतात. तसेच त्यांचे गद्य लेखनही तितकेच समृद्ध आहे. 'पावलापुरता प्रकाश' या त्यांच्या ललित संग्रहातील लेखांमधून आपल्याला याची पप्रचीती येते. यात अगदी साध्या, पण त्यांच्या मनाला भावलेल्या विषयांवरील त्यांचे कथन आहे. अगदी ब्रम्हकमळ, कोकणातील कुणकेश्वराचे मंदिर, पुण्यातील चित्तरंजन वाटिका, पंढरपूरचा विठ्ठल, अमेरिकेचा भव्यपणा आदी विषय यात येतात. आयुष्याच्या संध्याकाळी. रोजच रिकामा वेळ असल्याने, प्रत्येक दिवस हा रविवार वाटतो आणि प्रत्येक दिवस हा बोनस असल्याचे शेवटच्या लेखात म्हणतात. हे सर्व लेख म्हणजे एक चिंतन आहे.