Summary of the Book
थॉमस अल्वा एडिसन हे नाव ऐकले की बल्ब, टेलीग्राफ, फोनोग्राफ, चित्रपट अशा अनेक गोष्टी आठवतात, ज्यांच्याशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. एक हजार ९३ पेटंट त्यांनी मिळवली होती, अशी माहिती देऊन थोर वैज्ञानिक व अमेरिकेचे लोकनायक ठरलेल्या एडिसन यांच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न 'एडिसन अदृश्य नियमांचा ज्ञाता'मधून केला आहे.
एडिसन यांच्या आयुष्यातील घटनांचा मागोवा घेत त्यांनी स्वतःमधील आंतरिक क्षमतेचा शोध कसा घेतला हे यात मांडले आहे. वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बोलू न शकणारा हा मुलगा पुढे औद्योगिक क्रांतीचा मार्गदर्शक बनला. हे घडण्यामागील अदृश्य नियम कोणते होते, हे यात समजावून दिले आहे.
अपयशातून यशाचा शोध, संधी शोधण्यासाठी दृष्टिकोनाचे महत्व; सातत्य, जिद्द, चिकाटीच्या बळावर महान कार्य करण्याचे धाडस, स्वतःचा विचार न करता अव्यक्तिगत दृष्टीकोन बाळगण्याचे महत्व, अशक्य कार्य सहजशक्य करण्याची हातोटी आदी अदृश्य नियम अंगीकारून एडिसन यांनी विज्ञानाची कास धरून अनेक अचाट शोध लावले. हे सर्व कसे शक्य झाले आणि त्यातून इतरांनी काय बोध घ्यावा, यांचे मार्गदर्शन पुस्तकातून केले आहे.