Summary of the Book
विविध उद्योजकांचे चरित्र लिहिणारे सविता भावे यांनी कोल्हापुरातील उद्योगपती रामप्रताप झंवर यांचे चरित्र लिहिले आहे. उद्योजकांचा संघर्ष आणि त्यांचे वेगळेपण टिपण्याची भावे यांची शाली या पुस्तकातही दिसते. कोल्हापुरात रामप्रताप झंवर यांनी आपल्या उद्योगाचा पसारा कसा वाढवला, तो वाढवताना मूल्ये कशी पाळली, याचे वर्णन यात येते. झंवर यांच्या सहकाऱ्यांशी, नातेवाइकांशी बोलून भावे यांनी झंवर यांच्या वाटचालीची सुरेख माहिती दिली आहे.