Summary of the Book
जलतरणपटू शुभम वनमाळी याच्या रोमांचकारी जलतरण प्रवासाचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. शुभमचे आई - वडील दीपिका आणि धनंजय वनमाळी यांनी हा प्रवास शब्दबद्ध केला आहे. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया, इंग्लिश खाडी, जिव्लाल्टरची सामुद्रधुनी, कॅटलिना खाडी, मॅनहॅटन मॅरेथॉन स्विम यासारख्या जलतरण मोहिमा शुभमने पूर्ण केल्या आहेत. तरणतलावापासून ते समुद्रातील जलतरणाचा हा प्रवास रोमांचकारी आहे.
अभय अवसक यांनी या अनुभवांचे शब्दांकन केले आहे. जलतरणातील अडचणी, त्यावर केलेली मात, आव्हानक आलेल्या समस्या आणि त्यातून काढलेला मार्ग याबद्दलचे अनुभव अनेकांना मार्गदर्शक ठरतील. जलतरणाच्या क्षेत्रात शुभमने केलेला हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना दिशा दाखवणारा ठरणार आहे.