Summary of the Book
शहरी बालवाचक दूरदर्शन आणि इतर मनोरंजनाच्या साधनांशी जखडल्याने त्यांना गाव, तेथील शेतमळे, तेथला हसरा हिरवा निसर्ग यांची जवळची ओळख राहिली नाही. त्यांचा निसर्गाशी संबंध आलाच तर `पिकनिक’ पुरता!
अशा बालवाचकांना `कोजागिरी’ म्हणजे जिवंत निसर्गनगरीचा सहवास आहे. कथाकथन शैलीतील सुबोध अशा कथा `कोजागिरी’त आहेत. त्यांतून गावाकडील उत्सव, खेळ, पिके, शिकारीच्या मौजमजा, प्राणी, पक्षी, झाडे, फुले यांची अनेकांगी ओळख होते. गावाबरोबर मैत्री होते. ह्या मैत्रीतून बोधही मिळतो. ज्ञान, विज्ञान, मनोरंजनपर अशा किशोरकथांतून बालवाचकांतील अंधश्रद्धा सहज दूर होतात. उत्तम असा हा रानमेवा आहे.