Summary of the Book
`व्यवस्थापन घरीदारी’ हे पुस्तक म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनातील दैनंदिन समस्यांचा घेतलेला नेमका वेध आहे.
व्यवस्थापन शास्त्रातील संकल्पनांच्या आधारे या समस्यांवर उत्तरं शोधण्याचा केलेला एक यशस्वी प्रयत्न आहे. जीवनसंघर्षात यशस्वी होण्यासाठी दाखवलेला एक प्रभावी मार्ग आहे.
अर्थात या पुस्तकाचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी लेखकाने म्हटल्याप्रमाणे मुळात स्वतःसमोर स्वच्छ आरसा धरण्याची इच्छा मात्र असायला हवी. पुस्तकातील संकल्पना पुन्हापुन्हा वाचून, समजावून घेऊन, त्या प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची तयारी ठेवायला हवी.
प्रसन्न, खेळकर शैलीत आणि ललितरम्य भाषेत लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे सर्व यशाकांक्षी व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त आणि संग्राह्य ठेवा आहे.
-डॉ. प्र. चिं. शेजवलकर, ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ अधिष्ठाता, व्यवस्थापनविद्या शाखा, पुणे विद्यापीठ