Summary of the Book
'ही नवीन उमलणाऱ्या जाणिवांची गोष्ट आहे,' असे जेम्स रेडफिल्ड यांनी आपल्या मनोगतात नमूद केले आहे. ते सांगतात त्याप्रमाणेच हे पुस्तक उमलत्या जाणिवांचे आहे. रतन वैद्य आणी जुई नाडकर्णी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
'काय घडतंय याचं आकलन आपल्याला होऊ लागल्यावर आणि योगायोगांची सूचित करणारी प्रक्रिया सुरु कशी राहील, अधिक अर्थपूर्ण कशी होईल, हे लक्षात आल्यावर, मानवी समाजाचं एका संपूर्ण नवीन जीवनपद्धतीत आपल्या परंपरांची खऱ्या अर्थाने पूर्तता होऊन मानवी इतिहासाचं उद्दिष्ट असलेली संस्कृती निर्माण होईल, असेही लेखक पुढे सांगतात.
पेरू देशातील या कथा आहेत. सकारात्मक संदेश देणारे हे पुस्तक पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक आहे, असा दावाही लेखक करतात.