Summary of the Book
देवदास’ हे अनेकांनी पुन्हा पुन्हा बघितलेले शरदबाबूंचे लेखन म्हणजे मानवी जीवनाचे अचूक अवलोकन आहे. हे मूळचे बंगाली लेखन मराठीत आणतांना अनुवादिकेने मूळ लेखनाबद्दलचे आपले मनोगतही तेही वाचावेसे असे व्यक्त केले आहे.
"ह्या कादंबरीकडे प्रेमाची शोकांतिका एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून पाहणं हा तिच्यावर अन्याय होईल, ह्या प्रेमकहाणीच्या पार्श्वभूमीवर विसाव्या शतकाच्या आरंभीचा समाज उभा आहे."
असे जसे अनुवादिकेने म्हंटले आहे तसेच "शरदबाबू सहजसुंदर शैलीत अतिशय मोजक्या शब्दांत - संयमितपणे - हे समाजदर्शन घडवतात" अशीही ग्वाही अनुवादिकेने दिली आहे. त्यामुळे येथे साधारणत: माहिती असलेली कथा वाचनातला जसा आनंद आहे तसाच तो अनुवादिकेने दिलेल्या नव्या दृष्टिकोनाचाही आहे.