Summary of the Book
डॉ. सुरेश गरसोळे यांचं नाव घेतलं की भूगोल विषयाची आठवण येतेच. भूगोलाचं अध्यापन करताना त्यांनी विविध उपक्रम राबविले. गरसोळे यांनी पाठ्यपुस्तक महामंडळ आणि आळंदी देवस्थानमध्ये काम केलं. या दोन ठिकाणचे अनुभव, तसेच व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींवर त्यांनी या पुस्तकात लेखन केलं आहे. त्यांना पीएच.डी. करताना करावा लागलेला संघर्ष, जिद्दीनं त्यावर त्यांनी केलेली मात हे सारं यातून कळतं. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील मुशाफिरीबद्दलही यात तपशिलानं वाचायला मिळतं. त्यांचा परदेश प्रवास, त्या ठिकाणची निरीक्षण यातून वाचकाला चांगली माहिती मिळते.