Summary of the Book
छत्रपती ताराराणीने वसविलेले राज्य, अंबाबाईचे स्थान, छत्रपती शाहू महाराजांची राजधानी, भालजी
पेंढारकरांची चित्रनगरी असलेल्या करवीर नगरीला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय,
सामाजिक वारसा लाभला आहे. कोल्हापूरच्या गेल्या पाऊणशे वर्षातील परिचय माजी आमदार
बाबुराव धारवाडे यांनी 'जुनं कोल्हापूर' मधून करून दिलं आहे. जुना राजवाडा, बिंदू चौक,
पॅलेस थिएटर यांची सुरेख ओळख करून दिली गेली आहे..
कोल्हापूर सिनेटोन, व शालिनी सिनेटोन अशा अनेक जुन्या वास्तू तसेच डॉ. एस. जे. कुडाळकर, लोकशाहीर,
निकम, प्राचार्य बाळासाहेब खर्डेकर, माधवराव बागल,बाळासाहेब भोसले, भालजी पेंढारकर, लता मंगेशकर,
दिनकर द. पाटील अशी व्यक्तीमत्वच, शहाजी राजे, शाहू महाराजांचा दत्तक विधान, संस्थांनी पोलिसांचे अत्याचार,
महापालिकेची स्थापना, गांधी हत्त्या, आणि कोल्हापूरची दंगल, संस्थानातील राजकीय संघर्ष अशा अनेक घटनांना
त्यांनी उजाला दिला आहे...