Summary of the Book
वास्तवाशी फारकत घेऊन जीवन जगणे जसे अशक्य, तसेच आध्यात्माशी फारकत घेऊन आनंदी व समाधानी जीवन जगणे अशक्य. बहुतेकांचा, खास करून तरूण पिढीचा मात्र समज असतो, की आध्यात्मिक जीवन हे केवळ म्हातारपणी जगण्यासाठीच असते. जेव्हा इंद्रिये थकून गेलेली असतात, मनाची उमेद संपलेली असते, तेव्हा आपण आनंदाच्या शोधार्थ प्रवास सुरू करतो. हा आनंद आपल्याहून वेगळा, दूर कुठेतरी सातासमुद्रापलीकडे असतो, अशी आपली धारणा असते. खरे तर हा आनंद-समाधान अगदी आपल्याजवळ असतो, कारण तो आहे आपला मूळ स्वभाव.
‘लाइफ पॉज अॅन्ड प्ले’ हे पुस्तक आपल्या दैनंदिन जीवनात येणार्या
ऊन-पावसाच्या खेळाचे वास्तव आहे. आपल्या दैनंदिन जीवनात घडणार्या छोट्या-मोठ्या घटनाक्रमांचे निरीक्षण करून त्यावर थोडे आत्मपरीक्षण जर आपण केले, तर रोजच्या जीवनात आनंदाचे रोपण आपण सहज करू शकतो; हे या पुस्तकातील काही उदाहरणे आणि व्यक्तिचित्रांचा अभ्यास करून दिसून येते. तेव्हा जीवनाच्या संध्याकाळी आंबट चेहरा करून अध्यात्म जगण्यापेक्षा, आत्ताच या क्षणापासून सुरुवात का करू नये?
या पुस्तकाच्या प्रत्येक कथेमागे एक आध्यात्मिक सत्य दडलेले आहे. तेव्हा पुस्तक भराभर वाचून काढण्यापेक्षा, कथेमागे असलेले मर्म समजून घेत त्यातील संदेशावर जर रवंथ करता आले, तर मन:शांतीच्या शोधार्थ धडपडणार्या आपल्या सगळ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच साहाय्यक ठरू शकेल.